Sunday, December 1, 2024

महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ चुकीमुळे होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

आरोग्यमहिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 'या' चुकीमुळे होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढला आहे. त्यामुळे यापासून बचाव करणं अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल करणं गरजेचं आहे.

स्वत:ला ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. दारुचं सेवन हे खरंतर चुकीचं आहे. तुम्ही जास्त दारुचे सेवन कराल तितकी ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे दारु पासून लांब रहा.

ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे शक्य तितकं वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. ब्रेस्ट कॅन्सरला रोखण्यासाठी स्तनपान महत्त्वाची भूमिका बजावतं. तुम्ही जितकं जास्त वेळ स्तनपान कराल तितका स्तनाच्या कर्करोगावर संरक्षणात्मक प्रभाव जास्त असतो.

रजोनिवृत्तीनंतर हार्मोन बदलांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. त्रास जाणवत असल्यास ताबडतोब डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles