दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून गोकुळच्या दुध दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे.
यामध्ये गाईच्या दुधाचा दर 51 रुपयांवरुन 54 रुपये लीटरने वाढ झाली आहे. फक्त मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे याच शहरांत गोकुळनं दुध दरवाढ केली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
तसेच पुणे जिल्ह्यात गाईच्या दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात म्हशीच्या दुधाचे मोठे उत्पादन होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडर, बटरच्या दरात वाढ झाली.
कोरोना काळातील लॉकडाऊननंतर दूध दरात वाढ झाली असली तरी जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाने केलेली दरवाढ दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. महागाईच्या काळात ही दरवाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हातभारही लागणार आहे.