Wednesday, May 22, 2024

“हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका”

महाराष्ट्र"हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका"

जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केजरीवाल, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी सहभागी झाले होते. त्यावर, G-20 आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या देशासाठी यजमानपद मिळालंय. यात देशांतील अनेक मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रात 4 समिट बैठका होता आहेत. या बैठकीत सादरीकरण झालंय. त्यांचा पाहुणचार झाला, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

जी 20 परिषद हा फक्त केंद्राचा कार्यक्रम नव्हता. निमंत्रण सर्व पक्षाला गेलं होतं. राज्याचं देशाचं देशप्रेम यातून दिसलंय, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचंय?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. हे बेगडी प्रेम आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

विरोधकांवर टीका करताना, आता आम्ही समृद्धी मार्गावर गेलो तर काही लोक रस्त्यावर आले. मी मुख्यमंत्री झालो तर काही लोक घराबाहेर आले, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बेळगाव सीमा बांधवांबद्दल बोलताहेत त्यांनी धाडसीपणा आम्हाला सांगू नका. हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, सीमेवरील गावात विस्तारीकरण चाललंय. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते आज कार्यक्रमाला आले नाही. अजितदादा तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका. अजितदादांनी काय केलं? आरोपाला उत्तर देण्यासाठी आम्ही रिकामे नाही, आम्ही कामानं उत्तर देऊ, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles