Saturday, May 18, 2024

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

आरोग्यचांगल्या मानसिक आरोग्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

मानसिक स्वास्थ सगळ्यात गरजेचं आहे. या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ मिळणं जणू हरवलं आहे.

अनेकदा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी या सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे यावर अनेक संशोधनं करण्यात आली. अनेकदा आपल्याला सकस आहार खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पुढे काही असे पदार्थ सांगत आहोत जे तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य राखण्यासाठी मदत करतील.

आपलं मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी वनस्पती आधारित आहार घेणं गरजेचं आहे. तसेच वरचेवर आपल्या खाण्यापिण्यात बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली अनेक समस्यापासून सुटका होऊ शकते. आता नेमकं खायचं काय तर त्यासाठी तुम्ही फळे, भाज्या, धान्ये, काजू, बदाम खावू शकता.

मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी मांसाहार सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो. मांसाहर करणाऱ्यांना सीफूड देखील आवडतं. सीफूड मध्ये जास्तीजास्त मासा फायद्याचा ठरतो. यात ओमेगा 3 फॅटी अ‌ॅसिड असतात. हे फॅटी ‌अ‌ॅसिड डिप्रेशन ऱोखण्यास मदत करतात. त्यातल्या त्यात यासाठी तांबूस पिवळट रंगाचा थंड पाण्याचा मासा उत्तम मानला जातो.

धान्य कडधान्य आपल्या जेवणातला रोजचा भाग यात काही शंका नाही. त्यामुळे तुम्ही आहारात ओट्सचे जाडे भरडे पीठ, संपूर्ण धान्य ब्रेड, काॅर्न बार्ली आणि क्विनोआ यांचा समावेश करु शकता.

एका संशोधननुसार बेरी खाल्ल्याने देखील डिप्रेशनची लक्षणे कमी होतात. याशिवाय बदाम, भोपळ्याच्या बियांचा देखील यात समावेश होतो.

आक्रोडचे महत्व आपल्याला लहानपासून सांगण्यात आलं आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आक्रोड देखील महत्वाचं आहे. अक्रोडाचे नियमित सेवन तुमचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles