Sunday, May 19, 2024

जास्त तहान लागणं पण आहे आरोग्यासाठी धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

आरोग्यजास्त तहान लागणं पण आहे आरोग्यासाठी धोकादायक, होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

तहान भागवणारा महत्वाचा घटक पाणी आहे. पाणी जास्त पित असलो तरी अनेकाच्या घसा नेहमी कोरडा पडलेला असतो. काहींना सारखी तहान लागते. पाणी पिल्यानंतर सुद्धा घसा कोरडा राहतो. तहान लागल्यासारखं वाटतं. चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र जास्त तहान लागणं पण आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकतं यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

मधुमेह ही भारतातील एक गंभीर समस्या बनली आहे. शरीरीतील द्रवपदार्थांचे नियमन नीट न झाल्याने पाण्याची कमतरता जाणवते आणि सारखी तहान लागते. तुम्हाला सतत तहान लागत असल्यास मधुमेह असण्याची शक्यता आहे. टेस्टद्वारे तुम्हाला कळू शकतं. त्यानुसार तुम्ही उपचार करु शकता.

अनेकदा आपल्या तोंडातून दुर्गंध येतो. ओठ एकमेकांना चिकटतात. या सगळ्या गोष्टी आपल्या तोंडातील ग्रंथी लाळ निर्माण करत नाहीत. त्यामुळे तोंड कोरडे पडते आणि तहान लागते.

शरीरातील रक्तपेशी कमी झाल्या अथवा हिमोग्लोबीन कमी असेल तर आपल्याला अ‌ॅनिमिया हा आजर होतो. त्यावेळी खरतर आपल्याला काही जाणवतं नाही तहान पण लागत नाही. जसाजसा आजार बळावतो तशी तहान वाढू लागते. त्यामुळे वेळीच टेस्ट करणं गरजेचं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles