आजकाल गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढताना दिसते आहे. अशी प्रकरणं शहरातच काय पण ग्रामीण भागातही होताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं सगळीकडे खळबळ माजवून दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणंही आवश्यक ठरलं आहे. सध्या अशी प्रकरणं वाढताना दिसली तरी त्यातील चोरीच्या कल्पना या बदलताना दिसत आहे. त्यामुळे अशावेळी पुरावे कसे आणि कुठे सापडतील यावरही शंका उपस्थित होऊ शकते परंतु असे असले तरी वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणांमुळे सध्या सगळ्यांनी सावध होण्याची आवश्यकता वाढली आहे. नुकताच घडलेला प्रकार हा साकीनाका परिसरातील आहे. एका वयोवृद्ध व्यक्तीला त्यांना शंभर कोटींचे कर्ज देऊ म्हणून फसवणूक केल्याची ही घटना आहे. हा प्रकार आपल्यासोबत घडल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनं पोलिसांत तक्रार केली आहे.
प्रकाश गणपती भट (वय 63, रा. मरोळ, अंधेरी) यांची साकीनाका जंक्शन परिसरात स्वत:ची कंपनी होती. ते एअर कुलिंगचे उत्पादन करत होते. त्यांची कंपनी करोना काळात बंद पडल्यानं त्यांना आपली कंपनी ही पुन्हा सुरू करायची होती ज्यासाठी त्यांना कर्ज हवे होते परंतु यासाठी कर्जाचे आमिष दाखवून त्यांना लूबाड्यात आलं आहे, आपल्या कंपनीसाठी कर्ज हवे म्हणून त्यांनी काही बॅंकेत अर्जही केले होते. परंतु त्यांना कुठेच कर्ज मिळत नव्हते. याला कारण त्यांनी बॅंकेकडून याआधी कर्ज घेतलेच होते त्यासोबतच त्यांची कंपनी बुडीत असल्यानं त्यांच्या मार्गात पुन्हा एकदा कर्ज घेणे अवघड झाले होते. याचा परिणाम म्हणून पुन्हा कर्जासाठी अर्ज केलेल्या बॅंकेतच काय त्यांना कुठल्याही बॅंकेत कर्ज मिळणं मुश्किल झाले होते. ही परिस्थिती उद्भवल्यानं ते फार अस्वस्थ झाले होते.
शेवटी त्यांची असवस्थता त्यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितली. या मित्राने शाम तलरेजा नामक एका इसमाकडून कर्ज मिळेल असा विश्वास प्राप्त करून दिला. परंतु त्यांचा मार्ग साफ चुकला. प्रकाश आणि त्यांचे मित्र हे दोघेही शाम तलरेजा यांच्या साकीनाकाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी श्यामनं प्रकाश यांना त्यांच्या कंपनीला 100 कोटी रूपयांचे कर्ज मिळवून देऊ असे स्पष्ट सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून 5 लाख रोक रक्कम घेतली. त्याचबरोबर 18 लाख 42 हजार, 870 रूपये विम्यासाठी घेतले. काही दिवसांनी एका फाईव स्टार हॉटेलमध्ये ते भेटले आणि तिथे शामनं एका तिसऱ्याची माणसाची ओळख प्रकाशची करून दिली.
हा तिसरा माणूस म्हणजे दीपक ठाकूर. ज्याच्याकडून गणेशला कर्ज मिळेल असे आश्वासन दिले. प्रकाश याच्या कंपनीला गेल्या वर्षी जूलैमध्ये दीपक ठाकूर, शाम आणि त्याचा मित्र हितेश हे तिघंही भेट देऊन आले. ही कंपनी नाशिक येथे आहे. त्यावेळी हितेश या चौथ्या माणसाची ओळख आपला सनदी लेखपाल असल्याची शामनं करून दिली. त्यामुळे प्रकाशच्या मनात कसल्या संशयाला जागाच उरली नाही. शेवटी कसलेही विम्याचे कागदपत्रे न करता कर्जाचे आमिष दाखवून परत गणेशकडून या तिघांनी पुन्हा एकदा 24 लाख रूपये उकळले. आता या प्रकरणाचा साकीनाका पोलिसांनी तपास सूरू केला असून काहींना अटक केली आहे.