‘ये रिश्ता क्या केहलाता हैं’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री हिना खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हिना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. कायम आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता अभिनेत्रीने केलेल्या पोस्टमुळे चाहते चिंतेत आहेत.
हिनाची पोस्ट पाहून तिच्या खासगी आयुष्यात काही चढ-उतार झाल्याचं कळत आहे. अभिनेत्रीचं बॉयफ्रेंड रॉकी जायस्वाल सोबत ब्रेकअप झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हिनाने पोस्ट केलेल्या फोटोमुळे हिनाचं खासगी आयुष्य चर्चेत आलं आहे.
पहिल्या पोस्टमध्ये हिनाने लिहिलं आहे की, ‘फसवणूक एक अशी गोष्ट आहे, जी कायम टिकून राहते…’, तर दुसऱ्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, ‘ज्याने तुमची फसवणूक केली, त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला असेल तर, स्वतःला माफ करायला विसरु नका… कारण चांगलं मन वाईट गोष्टी पाहत नाही…’ या कारणामुळे हिना चर्चेत आली आहे.
हिनाने सोशल मीडियावर पोस्ट करताच डिलिट केली आहे. पण पोस्टचे स्क्रिन शॉर्ट व्हायरल होत आहेत. स्क्रिन शॉर्ट पाहून अनेकांनी अभिनेत्रीला ‘हिना काय झालं…’ असं विचारलं आहे. पोस्टनंतर हिना ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
हिनाच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. हिनाच्या पोस्टनंतर खरंच तिच्या खासगी आयुष्यात चढ-उतार आले आहेत की अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी सर्व काही केलं आहे. हे सत्य येत्या काही दिवसांत चाहत्यांच्या समोर येईल.