शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मागं संकटांचा ससेमिराच लागला आहे. कधी पक्षचिन्ह तर कधी आमदार फुटी यामुळे ठाकरेंना वरचेवर धक्के बसतच असतात.
सध्या शिवसेना कोणाची हा वाद कोर्टात सुरु आहे. तो ताप डोक्याला असतानाच ठाकरे कुटुंबीयांना एक झटका बसला होता. त्यांच्या जवळील व्यक्तीनेच ठाकरे कुटुंबाकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप केला होता.
अशातच या तक्रारीनंतर ठाकरे कुटुंबियांची चौकशी सुरु होती. या संबधी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर आज सुणावणी पार पडली. हायकोर्टाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.
गुरुवारी या प्रकरणासंबधी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती डि.सी. ठाकूर आणि न्यायमूर्ती व्ही. एस मेनेझेस यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुणावणी पार पडली. त्यांनी या प्रकरणातील निकाल राखून ठेवला आहे.
ठाकरे कुटुंबावर लावण्यात आलेल्या या आरोपांची याचिका सुणावणीस योग्य आहे की नाही?. यावर आता कोर्ट निकाल देणार आहे. हायकोर्टाने ही याचिका सुणावणीस योग्य असल्याचा निर्णय दिल्यास ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात.
ठाकरे कुटुंबांकडे राजकारणातून सोडल्यास दुसरा कोणताच कमाईचा स्त्रोत नाही आहे. तरी देखील एवढी संपत्ती कशी? असा आरोप करत. त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी यासाठी गौरी भिडे यांनी याचिका दाखल केली होती.