Friday, March 29, 2024

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ नागरिकांना भरावा लागणार नाही कर

देशकेंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ नागरिकांना भरावा लागणार नाही कर

२०२३ चा अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता कर भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return -ITR) भरण्याच्या अर्जात मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. यानुसार आता ७५ वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरण्याची गरज लागणार नाही.

• ज्येष्ठ नागरिकांना कर सवलत

भारतातील सर्व ज्येष्ठ नागरिक हे पेन्शन आणि इतर काही सरकारी योजनांच्या आधारे आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या या उत्पन्नावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. सरकारने ज्येष्ठ नागरिकांना यातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्रालयाने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार आता देशातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या वर्षांपासून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन किंवा इतर योजनांचा फायदा होत नाही त्यांच्यासाठी हा दिलासादायक निर्णय आहे. हे नवे कलम एप्रिल २०२१ पासून लागू करण्यात आले आहे. या बदलांची माहिती बॅंकांना देण्यात आली आहे. याविषयीच्या अटी आणि शर्तींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कर सवलत मिळवण्यासाठी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १२-BBA अर्ज बॅंकेत जमा करावा लागणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles