Saturday, November 9, 2024

एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा अटकेत

देशएअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा अटकेत

न्यूयाॅर्कहून दिल्लीला जाणा-या एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत लघुशंका करणा-या शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

• बंगळुरमध्ये मिश्राचे लास्ट लोकेशन

शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांंनी लोकेशन ट्रेस करणा-या सुरुवात केली होती. शंकर मिश्राचे शेवटचे लोकेशन बंगळुरुमध्ये सापडले होते. त्याच्या आधारे शंकर मिश्राचा शोध घेण्यात आला. मात्र, मिश्रा त्याचा फोन सातत्याने बंद करत होता. त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी आल्या. अखेर त्याला अटक करण्यात बंगळुरु पोलिसांना यश आले आहे.

• शंकर मिश्राची कंपनीकडून हकालपट्टी

शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोने त्याला नोकरीवरुन काढून टाकले होते. कंपनीच्यावतीने एक निवेदन जारी करताना, म्हटलं होते की, कंपनी आपल्या कर्मचा-यांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर यांच्यावरील आरोप अत्यंत खेदजनक असून त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करु, असेही कंपनीने म्हटले आहे.

• नेमके प्रकरण काय?

26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशी महिलेवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरु केला. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles