Thursday, September 19, 2024

अपघातांची मालिका सुरुच; आता शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या गाडीला भीषण अपघात

महाराष्ट्रअपघातांची मालिका सुरुच; आता शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या गाडीला भीषण अपघात

आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूरनजीक कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा रायगड हद्दीत अपघात झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील नेत्यांच्या वाहनांचा अपघात होण्याचे सत्र सुरुच असल्याचे पहायला मिळत आहे.

सुदैवाने आमदार योगेश कदम अपघातानंतर सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला चोळई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

अपघातात आमदार कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. भरधाव वेगातील टॅंकरेने आमदार कदम यांच्या गाडीला धडक दिली. मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टॅंकर पलटी झाला आणि चालक पळून गेला. आमदार कदम यांच्या गाडीला धडक बसल्यानंतर टॅंकर पोलिसांच्या गाडीला धडकला.

• राज्यातील नेत्यांच्या गाडीच्या अपघाताची मालिका सुरुच

टॅंकर गाडीला धडकल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या गाडीच्या अपघाताची मालिका सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळा, अशी विनंती करण्यात येत आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles