सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वाळा म्हणजे सोल फ्लेयरमुळे स्फोट होतात. गेल्या चार वर्षांतील सूर्याच्या पृष्ठभागावर हा सर्वात मोठा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट AR 2838 नावाच्या सनस्पाॅटवर झाला आहे. AR 2838 हा आतापर्यंतचा चार वर्षांतील सर्वात मोठा सोलर फ्लेअर स्फोट असल्याचे मानले जाते. या स्फोटाला X1.5 श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. या सौर स्फोटाकडे नवीन सौरचक्र म्हणून पाहिले जात आहे.
सूर्याच्या उत्तर- पश्चिम दिशेला हा सनस्पाॅट होता, त्यावर स्फोट झाला. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पाॅट जागा बदलण्याची शक्यता आहे, हा सनस्पाॅट काही काळ त्या जागी राहिला तर तो पृथ्वीवरुनही दिसू शकतो. अटलांटिक महासागरावरील शाॅर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआऊटममुळे पृथ्वीवर सौरवादळाचे परिणाम जाणवले.
• सौरवादळाचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. या सौर ज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पाॅवर ग्रीड्स, GPS वर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.