Tuesday, May 21, 2024

उंदीर बनणार ‘जासूस’, DRDOचे अफलातून संशोधन

तंत्रज्ञानउंदीर बनणार ‘जासूस’, DRDOचे अफलातून संशोधन

शत्रूंची गुप्त माहिती मिळावी, यासाठी चक्क उंदीरच सुरक्षा यंत्रणांचे गुप्तहेर होतील, अशी यंत्रणा डीआरडीओने विकसित केली आहे. रिमोटद्वारे, उंदरांच्या मेंदूंच्या क्रिया संचलित करता येणार आहेत. लवकरच हे तंत्रज्ञान सुरक्षा यंत्रणांना सोपवण्यात येणार आहे,असे झाल्यास याचा संरक्षण क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

आपत्कालीन स्थितीत सुरक्षा यंत्रणांना सहजपणे नेमकी माहिती मिळावी यासाठी रॅट सायबोर्ज हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

• कसे करणार काम?

उंदरांच्या मेंदूत इलेक्ट्रोएन्सोफॅलोग्राम बसवण्यात येते. यात सेन्सर्स असतात. ते थेट संगणकाशी जोडले जाते. ऑपरेटर उंदराला नेमक्या दिशेकडे वळणे, थांबणे, मान वळवणे, इत्यादी निर्देश देऊ शकतो. उंदरांना याबदल्यात त्यांच्या मेंदूंना सुखावणा-या इलेक्ट्रिक पल्स देण्यात येतात. यामुळे उंदरांच्या मेंदूकडून प्रत्येक निर्देशाचे पालन होते. दुसरीकडे उंदरांच्या शरीरावर ऑडिओ व व्हिडीओ टिपणारी नॅनो यंत्रे लावण्यात आल्यामुळे कुठल्याही जागेवरील आवाज व चित्र कळू शकते. यासाठी वैज्ञानिकांनी अॅडव्हान्स अल्गोरिदम तयार केला. यात ऑटो कॅलिबरेशनचा उपयोग करण्यात आला आहे.

दुस-या टप्प्यात उंदरांच्या मेंदूंवर वायरलेस कंट्रोल राहणार आहे. यादृष्टीने सेन्सर्स व इतर यंत्रणा विकसित केली जात आहे. उंदरांच्या डोक्यात एखाद्या व्यक्तीचे वा जागेचे चित्र फिड करण्यात येईल. ती वस्तू दिसल्यावर आपोआपच थांबवण्याचे निर्देश त्यांच्या मेंदूंकडून मिळतील.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles