Thursday, September 19, 2024

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

देशकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सीआरपीएफकडून ग्राम विकास समितीच्या अंतर्गत गावकऱ्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसात पुँछ आणि राजौरीमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राजौरी जिल्ह्यातील धनगरीमध्ये प्रत्येक ग्रामरक्षा समितीतील एखाद्या सदस्याला SLR रायफल देण्यात येणार आहे. तर काही ग्राम रक्षा समित्यांमध्ये दोन ते तीन सदस्यांना स्वयंचलित रायफल्स देण्यात येणार आहेत.

राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावात सोमवारी, ९ जानेवारी रोजी एक विशेष शिबीर राबवण्यात आले, यात जवळपास १०० सदस्यांना शस्त्र देण्यात आली. यात ४० माजी सैनिकांचा समावेश आहे. ज्यांना एसएलआर रायफल देण्यात आली आहे. पोलिसांच्या मार्फत राबवण्यात आलेल्या शिबीरात ६० स्थानिक लोकांना देखील बंदुक देण्यात आली. आतापर्यंत एकूण ३०३ शस्त्रांचे वाटप करण्यात आले. ४० माजी सैनिकांना सेल्फ-लोडिंग रायफल देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन दहशतवाद्यांना तात्काळ उत्तर देता येईल.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles