Tuesday, May 21, 2024

राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढणार!

महाराष्ट्रराज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढणार!

रविवारपासून राज्यातील बहुतांश भागांत थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीच्या वाढत्या प्रभावाने पुढील दोन दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज भारतीय वेधशाळेने दिला आहे. या दोन्ही भागांतील किमान तापमान १० अंश तर कमाल तापमान ३० अंशाच्याही खाली येत असल्याची नोंद भारतीय हवामान खात्याने केली.

हिमालय पर्वतरांगाच्या पश्चिमेकडील भागांत थंडीला पूरक ठरणा-या पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स)या स्थितीमुळे सध्या हिमालय भागांत हिमवृष्टी सुरु होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला. वाढत्या थंडीच्या प्रभावाने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात या राज्यांत येत्या दिवसांत हलका पाऊसही होईल. उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा प्रभाव मध्य भारतातही दोन दिवसांपासून दिसून येत आहे. वाढत्या थंडीच्या प्रभावामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेशांत तसेच महाराष्ट्रातही थंडीच्या लाटेचा प्रभाव आहे. कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील भागांतही थंडीच्या लाटेचा प्रभाव सोमवारी दिसून आला. महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंशाने घसरण झाली आहे.

कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत तीन अंशाने घसरण झाल्याचे निरीक्षण वेधशाळेने नोंदवले. राज्यासह दक्षिण राज्यातील महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांतही पुढील दोन-तीन दिवस किमान तापमान कमीच राहील.

• वेगरीज ऑफ व्हेदरने राज्यातील किमान तापमानाची केलेली नोंद (अंश सेल्सिअस)

नाशिक खेडगाव – ३.६
ओझर (नाशिक)- ४.७
नेरी डिगर जळगाव – ४.८
देऊळगाव माळी (बुलडाणा)-४.९
जळगाव आणि धुळे – ५
उरळ (अकोला) आणि औरंगाबाद – ५.७
महोरा (जालना) – ६
हसनबाद (जालना)- ६.४
रोहिलागड (जालना)- ६.५
हिंगणघाट (वर्धा) – ६.८
पुसड(यवतमाळ)-७
जुन्नर (पुणे)- ७.७
मालेगाव (नागपूर)-७.६
निगुणघर (पुणे)-७.९
माळीण (पुणे)-८.१
शेतीव्यवसाय महाविद्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा अकादमी – ८.३
अहमदनगर – ८.५
पुणे – ८.६
खेड, शिवापूर (पुणे), नाशिक – ८.७

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles