Thursday, September 19, 2024

मंत्री केसरकरांचे राऊतांना प्रत्त्युत्तर

महाराष्ट्रमंत्री केसरकरांचे राऊतांना प्रत्त्युत्तर

उद्धव गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
‘न्यायालयावर आमचा विश्वास आहे, लवकरच उद्धव गटाला न्याय मिळेल’, असे भाकित संजय राऊत यांनी केले होते. मात्र त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी सडेतोड प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी आपली भविष्यवाणी सुधारावी, असे म्हटले आहे.
‘राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला’ असे म्हणत संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘आधी सुनावणी तर होऊ द्या’ असे म्हणत प्रत्त्युत्तर दिले आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles