Monday, June 24, 2024

‘राणा प्रकरणात पोलीस मॅनेज झाले आहेत का?

महाराष्ट्र‘राणा प्रकरणात पोलीस मॅनेज झाले आहेत का?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद मुंबईच्या शिवडी कोर्टात सुरू आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करायचे निमित्त साधत अरविंद सावंतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

‘नवनीत राणा यांच्या जातीचा दाखला खोटा निघाला, पोलीस नवनीत राणांवर कारवाई करत नाहीत’, असे वक्तव्य सावंतांनी केले आहे. तसेच ‘पोलीस मॅनेज झाले आहेत का ?, असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अमरावतीत उद्धव गटाने सोमवारी मशाल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर, मशाल जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सावंत बोलत होते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles