भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. गौतम अदानी हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरे आणि अदानी यांच्यामध्ये काही वेळ चर्चा ही झाली. ही भेट झाल्यानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यामुळे या लगोलग झालेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा घडत आहेत.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डिनर डिप्लोमसी होताना दिसून येत आहे. फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी राज ठाकरे पोहचले आहेत. या लगोलग झालेल्याभेटींचा राजकीय अर्थ काढले जातील. फडणवीस यांनी राज ठाकरेंना डिनरसाठी निमंत्रण दिले होते. मात्र या भेटीची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेत्यांशी जवळीक वाढली होती.
राज ठाकरे यांची आगामी निवडणुकांसाठी भूमिका ‘एकला चलो रे’ ची आहे. मात्र भाजपच्या प्रमुख नेत्यांशी त्यांच्या होणाऱ्या भेटी, यामुळे आता पडद्यामागे राडकीय घडामोडींना वेग आले आहे. पडद्यामागे काही शिजतंय का? नवीन काही राजकीय समीकरणं घडून येतायेत का? या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. याबाबत आता चर्चांना, तर्क वितर्कांना उधाण आले आहे.