बॅंक कर्मचारी फेब्रुवारी महिन्यात संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. बॅंक कर्मचा-यांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या बैठकीत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॅंक कर्मचा-यांनी 30 ते 31 जानेवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स ही विविध बॅंक कर्मचा-यांच्या संघटना एकत्र करुन स्थापन केलेली संघटना आहे. बॅंक संघटनांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारवर दबाव आणण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लाॅईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सची बैठक झाली आहे. आमच्या मागण्यांबाबत पत्र लिहूनही इंडियन बॅंक असोसिएशनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. त्यानंतर बॅंक संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅंक कर्मचारी युनियनने बॅंकिंग कामकाज पाच दिवसांचे करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय, राष्ट्रीय पेन्शन योजना संपुष्टात आणावी, पगार वाढी बाबत वाटाघाटी सुरु कराव्यात, बॅंकांमधील सर्व कॅडरमध्ये भरती प्रक्रिया लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकरता आत बॅंक कर्मचा-यांनी संप पुकारला आहे.