Tuesday, July 23, 2024

गडचिरोलीतील अहेरीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; शस्त्रसाठा जप्त

महाराष्ट्रगडचिरोलीतील अहेरीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; शस्त्रसाठा जप्त

गेल्या महिन्यापासून दक्षिण गडचिरोलीतील जंगल परिसरात नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाले आहेत. रविवारी सायंकाळी गडचिरोलीतील अहेरी येथे नक्षलवादी आणि पोलिसांत मोठी चकमक झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, २० ते २५ नक्षवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

दक्षिण गडचिरोलीत रविवारी सायंकाळच्या वेळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली. भामरागड आणि आलापल्ली या मार्गावरील वेडमपल्ली जंगल परिसरात पोलिसांनी गस्त घातला होता. त्याच दरम्यान लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी चोख प्रत्युत्तर नक्षलवाद्यांना दिले. त्यानंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी त्या भागातून पळ काढला. या भागात २० ते २५ नक्षलवादी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ही मोठी चकमक झाल्यानंतर पोलिसांनी या भागाचा तपास केला. त्यावेळी पोलिसांना नक्षलवाद्यांचे भरमार बंदूक, पिस्तूल, वॉकी टॉकी, पुस्तके, औषधे असे साहित्य आढळून आले. या घटनेनंतर या भागात पोलिसांनी आणखीन मोठा बंदोबस्त केला आहे.

दरम्यान मागील महिन्यात डिसेंबरमध्ये देखील दक्षिण गडचिरोलीमध्ये एटापल्ली आणि भामरागड जंगल परिसरात नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात हालचाल सुरू असल्याचे समजले होते. नक्षलवादी घातपाताच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या भागात सतर्कतेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीसबळ तैनात करण्यात आले होते. तसेच यापूर्वी नक्षलवाद्यांचा वरिष्ठ नेता गिरीधरने या जंगल भागात बैठक घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे या भागात घातपाताच्या शक्यतेने पोलिसांच्या सर्वत्र यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles