Wednesday, November 20, 2024

नेपाळ विमान दुर्घटनेत पाच भारतीयांचा मृत्यू

दुनियानेपाळ विमान दुर्घटनेत पाच भारतीयांचा मृत्यू

नेपाळमध्ये रविवारी विमानाचा अपघात होऊन 68 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश असून, ते उत्तर प्रदेशातील गाझीपूर आणि वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी होते. विशाल शर्मा, सोनू जैस्वाल, संजय जैस्वाल, अभिषेक कुशवाह आणि अनिल राजभर अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण 13 जानेवारीला नेपाळ पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्यापैकी एकाने अपघातापूर्वी विमानाच्या आतून व्हिडिओ शूट केला.

नेपाळमध्ये रविवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात मृत पावलेल्या पाच भारतीय नागरिकांपैकी चार जण पोखरा पर्यटन केंद्रात पॅराग्लायडिंग उपक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. एका स्थानिक नागरिकांने ही माहिती दिली. मध्य नेपाळमधील पोखरा शहरात नव्याने सुरु झालेल्या विमानतळावर रविवारी सकाळी यती एअर लाईनचे विमान दरीत कोसळले. विमानात पाच भारतीयांसह 72 जण होते. या अपघातात विमानातील 68 जणांचा मृत्यू झाला.

अपघातग्रस्त विमानात बसलेल्या पाच भारतीयांची नावे अभिषेक कुशवाह (25), विशाल शर्मा (22), अनिल कुमार राजभर (27), सोनू जैस्वाल ( 35), आणि संजय जैस्वाल( 35). यापैकी जयस्वाल हा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी होता. या पाचपैकी चार भारतीय शुक्रवारीच भारतातून काठमांडूला पोहोचले होते. नेपाळमधील रहिवाशाने सांगितल्याप्रमाणे, विमानात बसलेले चार भारतीय पोखरा शहरात पॅराग्लायडिंग करण्यासाठी जात होते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles