Wednesday, May 22, 2024

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परिक्षेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी बोर्डाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रदहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परिक्षेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी बोर्डाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च यादरम्यान होईल. याच पार्श्वभूमीवर परीक्षेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी पहिल्यांदाच पुणे बोर्डाने नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाहीत. राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा पार पडणार आहे.

यंदा 10वीचे 17 लाख आणि 12 वीचे 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यासाठी 9 हजार केंद्रे असणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची बाब खर्चिक असल्याने सध्या परीक्षकांच्या मोबाईलवर झूम काॅल करुन परीक्षा हाॅलमधील तीन तासांचे शुटिंग केले जाणार असल्याचे पुण्याच्या शिक्षण बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये परीक्षा सुरु झाल्यापासून उत्तर पत्रिका संकलित करेपर्यंतचे परीक्षकांच्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग केले जाणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles