सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अनेक खुलासे होताना दिसत आहे. दाऊतचा भाचा म्हणजेच हसीन पारकरचा मुलगा अलीशाह पारकरच्या एनआयएकडून झालेल्या चौकशीतून दाऊदच्या दुसऱ्या लग्नासह त्याने पत्ता बदलल्या पर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. आता दाऊदचा राईड हँड असलेल्या छोटा शकीलला मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली खंडणी पाकिस्तानात पाठवल्याची माहिती समोर आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने केलेल्या तपासून ही माहिती समोर आली आहे.
एनआयए तपासातील माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा राईड हँड असलेला छोटा शकील पाकिस्तात बसून मुंबईतील व्यापार चालवत आहे. दरम्यान याप्रकरणात अटकेत असलेला आरिफ भाईजान, जो छोटा शकीलचा नातेवाईक आहे. त्यांच्या संपर्काचा वापर करून २०१७-१८ साली एका व्यापाऱ्याकडून १६ ते १७ कोटी गोळा केले. आणि हे पैसे दुबई मार्गे पाकिस्तानात पाठवले होते, असे समोर आले आहे. हे पेसै पाठवण्यासाठी अहवालाचा वापर करण्यात आला होता. दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांच्याकडून पैसे गोळा करणे, ते पैसे अहवालाच्या माध्यमातून पाकिस्तानात पाठवले जाणे, त्या पैशाचा वापर डी-कंपनी चालवण्यासाठी आणि अनधिकृत, असामाजिक तत्वांना घेऊन चालणाऱ्या कारवायांसाठी केला जातो. याप्रकरणी एनआयएचा सध्या अधिक तपास सुरू आहे.
एनआयएच्या तपासातून दाऊदची नेटवर्क चालवण्याची पद्धतही समोर आली आहे. दाऊद जरी थेट संपर्कात नसला तरी, त्याने आपली गँग आणि कारभारासाठी अनेक स्वतंत्र नेटवर्क उभारले आहेत. त्याद्वारे दाऊद आपल्या कंपनीतील लोकांशी संपर्क साधतो. तसेच दाऊद त्याचा निरोप किंवा सूचना छोटा शकीलला देतो. त्यानंतर शकील त्या निरोपाचे रुपांतर करून पुन्हा सांकेतिक भाषेतील व्हॉइस मेसेजमध्ये करतो. यासाठी विशिष्ट पासवर्ड असतो. मग शकीलकडून दुबईत जैदला तो मेसेज पाठवला जातो. अशा प्रकारे दाऊदचे पाकिस्तानातून मेसेज भारतापर्यंत पोहोचवले जातात.