Tuesday, December 3, 2024

राज ठाकरेंना दिलासा; परळी न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

महाराष्ट्रराज ठाकरेंना दिलासा; परळी न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

२००८ साली चिथावणीखोर वक्तव आणि कार्यकर्त्यांनी बसेसची केलेली तोडफोड यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल होता. या संदर्भात वेळोवेळी न्यायालयाकडून राज ठाकरेंना समन्स बजावण्यात आला होता, पण त्यावेळेला ते गैरहजर राहिले. मात्र आता राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात होते. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहणे गरजेचे होते. त्यानुसार बुधवारी राज ठाकरेंनी परळी न्यायालयात हजेरी लावली असून ५०० रुपयांचा दंड ठोठावत न्यायालयाकडून त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. अवघ्या पाच ते सात मिनिटांत ही सुनावणी पार पडली आहे.

मुंबईत ऑक्टोबर २००८ साली राज ठाकरेंना अटक झाली होती. या अटकेविरोधात मनसैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर दगडफेक करून तोडफोड केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ३ आणि १२ जानेवारीला राज ठाकरेंना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र राज ठाकरे न्यायलयात हजर राहिले नाहीत. मग पोलिसांनी दोषारोप पत्रही न्यायालयात सादर केले. पण राज ठाकरे न्यायालयाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक तारखेला गैरहजर राहिले. त्यामुळे अखेर त्यांच्याविरोधात न्यायलयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले.

राज ठाकरे बुधवारी परळी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांत न्यायालयाने निर्णय घोषित केला. न्यायालयात राज ठाकरेंनी आपल्याविरोधात असलेले वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड ठोठावून राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द केले.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles