Tuesday, November 19, 2024

शरद पवारांचं शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर मोठं विधान

महाराष्ट्रशरद पवारांचं शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर मोठं विधान

शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती सोमवारी, २३ जानेवारील घोषित होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी रविवारी दिली होती. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. पण या युतीबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.

रविवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सांगितले होते की, ‘शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत बोलणं झालं असून उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी अशी आमची भूमिका आहे. पण सध्या युतीबाबत ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे. सर्वांनी एकत्र मिळून युतीबाबत घोषणा करावी, असं उद्धव ठाकरेंचं मत आहे.’असं असताना शरद पवारांच्या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान सोमवारी सकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दुपारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती दिली. राऊत म्हणाले की, ‘या दोन शक्ती एकत्र याव्या हे हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होत. ही शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन विचारांची युती आहे. सोमवारी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा होईल. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची संयुक्त पत्रकार परिषद होईल.’

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles